Akola Crime News: बाप नाही तू तर साप! पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

Crime News: या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On

Akola News: अकोल्यातून बापाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पाय दाबून देण्याचा बहाणा करत बापाने सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीच्या आईने २१ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार २० सप्टेंबर २०१४ च्या रात्री आरोपीने त्याच्या पत्नीला सांगितले की, तिच्या बहिणीची तब्येत खराब आहे व तिच्या देखभालकरिता भुसावळला तुला जायचे आहे.

Beed Crime News
Nagpur Crime News: मुलीच्या पोटात दुखत होते म्हणून आईने डॉक्टरकडे नेले, तपासणी केल्यानंतर सगळेच हादरले...

त्यामुळे पीडितेची आई ही भुसावळ येथे गेली व त्या रात्री पीडित मुलीसह तिच्या दोन लहान बहिणी घरी झोपल्या होत्या. आरोपी किशोर काळे हा रात्री १२ वाजेच्या सुमारास दारू पिऊन आला व त्याने पीडित मुलीला पाय दाबायला सांगितले, मुलगी पाय दाबत असतानाच, आरोपीने अचानक उठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता, पीडितेची बहीण व तिची आई यांची साक्ष व पुरावे महत्त्वाचे ठरले, तसेच इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

Beed Crime News
Nagpur Crime News: 'ती स्वर्गात येण्यासाठी हट्ट करतेय..' मैत्रिणीच्या मृत्यूनंतर २२ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; नागपूरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com