Nagpur Crime News: 'ती स्वर्गात येण्यासाठी हट्ट करतेय..' मैत्रिणीच्या मृत्यूनंतर २२ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; नागपूरात खळबळ

Nagpur News: मैत्रिणीच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमधून या तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam tv

Nagpur Crime News: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका तरुणीने मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. "मैत्रीण स्वर्गात वाट बघत आहे, मला बोलावत आहे..." असे तिच्या कुटूंबीयांना सांगत प्रियंका नंदराव सराटे या २२ वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)

Nagpur Crime News
Solapur Crime: विश्वासू नोकरानेच दिला दगा; तब्बल 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदीची चोरी

याबाबत कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका नंदराव सराटे या तरुणीच्या मैत्रिणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मैत्रिणीच्या मृत्यूने प्रियंका डिप्रेशनमध्ये होती. तेव्हापासून ती "मैत्रीण स्वर्गात माझी वाट बघत आहे. ती मला नेहमी बोलावते. स्वप्नात येऊन सोबत नेण्याचा प्रयत्न करते. ती स्वर्गात एकटीच आहे, त्यामुळे तिला साथ देण्यासाठी मला जायचं आहे" असे कुटुंबीयांना वारंवार सांगत होती.

‘मैत्रिण स्वर्गात येण्यासाठी हट्ट करीत आहे’, अशी माहिती ती आईला सांगत होती. तिचे कुटूंबीय तिची समजूत काढत होते. मात्र ती कामावर गेल्यानंतरही मैत्रीणीसाठी रडत होती. याच डिप्रेशनमधून या तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. (Crime News)

Nagpur Crime News
Lok Sabha Election 2024: शिवसेना-भाजप लोकसभेच्या जागावाटपाबाबत फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

मैत्रीण स्वर्गात एकटी असल्याचा भास झाल्याने प्रियंकाने घराशेजारी असलेल्या बर्फाच्या कारखान्यातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी मजूर कामावर कारखान्यात आल्यानंतर त्याला पाण्यात प्रियंकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com