राममंदिरानंतर लालबागमध्येही दानपेटीवर डल्ला? आधी कार्यकर्त्यांची मुजोरी आता दानाची चोरी?

Madhoo Shah's Lalbaugcha Raja: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लागबागचा राजाच्या चरणी लाखो भाविक कोट्यवधींचं दान देत असतात... मात्र, यंदा लागबागचा राजाच्या दरबारात मुजोरीनंतर पहिल्यांदाच दानचोरीचा आरोप करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय आहे?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Lalbaugcha Raja donation controversy viral video
Lalbaugcha Raja donation controversy viral videosaam tv
Published On

राममंदिरातील दानचोरीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलचं घेरलं... लोकसभेत राममंदिरातील दानचोरीचा मुद्दा गाजला आणि तपासाची चक्र वेगानं फिरली...अशातच आता राममंदिरातील दानचोरीनंतर भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी कॅमेऱ्यासमोरच पैसे गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

अभिनेत्री मधू शाहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं... चरणी नतमस्तक होत, दर्शनानंतर हातातील नोटा राजाच्या चरणी तिथे असलेल्या थाळीत अर्पण केल्या. ...मात्र मधू शाहांची पाठ फिरताच... तिथे उभा असलेल्या एका कार्यकर्त्यानं तातडीनं त्या नोटा उचलून मागे कोपऱ्यात असलेल्या एका कापडी थैलीत कोंबल्या... हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे या दान चोरीचं बिंग फुटल्याची जोरदार चर्चा आता रंगलीय. लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांवर कार्यकर्तेच डल्ला मारत असल्याचा आरोप भक्तांकडून केला जाऊ लागलाय... आतापर्यंत लालबागच्या चरणी किती दान भक्तांनी अर्पण केलयं..पाहूयात..

आता लालबागच्या चरणी अर्पण झालेली ही रक्कम पाहून अनेकांना धक्का बसला असेल..मात्र ही रोखरक्कम फक्त मंदिरातील दानपेटीतील आहे... त्याव्यतिरिक्त बाप्पाच्या पायाशी ठेवलेल्या आणि थैलीत जमा करत असलेल्या पैशांचा हिशोब नेमका कोण ठेवतं? हा खरा प्रश्न आहे...

व्हीआयपी कल्चरमुळे लालबाग मंडळ आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलंय... लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी कुठे कार्यकर्त्याकडून भाविकांना धक्काबुक्की केली जाते... तर कुठे तासानतास रांगेत उभं राहिल्यानं भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते... तर कुठे मीडिया कव्हेरेजला गेलेल्या पत्रकारांशी पोलिस अरेरावी करतात...

आता दानचोरीच्या मुद्यावरून लालबाग मंडळ वादात सापडलंय.

याबाबत लालबाग मंडळाशी संपर्क साधला असता यावर बोलायला कुणीही तयार नाही. मात्र बाप्पाच्या चरणी ठेवलेल्या दानावर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com