Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

Diva - Chiplun Memu Railway : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केवळ ८ डब्यांची क्षमता असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अतिरिक्त डब्यांची मागणी वाढत आहे.
Diva - Chiplun Railway
Dadar-Chiplun Memu Passenger Konkan Railway NewsSaam Tv
Published On
Summary
  • कोकण रेल्वेची दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी जाहीर

  • 1 मे ते 7 जून दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार

  • केवळ ८ डब्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी

  • अतिरिक्त डबे आणि गाड्यांची मागणी वाढली

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवा स्टेशनवरून सुटणारी ८ डब्यांची चिपळूण मेमू रेल्वे १ ते ७ मे दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. यामुळे कोकणवासीयांचा प्रवास आरामदायी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही रेल्वे ८ डब्यांची असल्याने रेल्वेतील गर्दी कमी होणार की वाढणार? ही खेळण्यातील गाडी कोणासाठी? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या गाडीचे डबे वाढवले जाणार का? याकडे कोकणवासीयांची लक्ष लागले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात जात असतात. त्यातच सध्या शाळा-कॉलेजांच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांची संख्या अधिक वाढते. कोकण रेल्वे प्रशासनाने गुरुवारी दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी सुरू करण्याची घोषणा केली.

Diva - Chiplun Railway
Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

गाडी क्रमांक 01159 ही विशेष गाडी 1 मे ते 7 जून या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस – शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी दिवा स्थानकातून रात्री 11.25 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे. मात्र, या गाडीची क्षमता केवळ 8 डब्यांची असल्याने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या तुलनेत ती अत्यंत अपुरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Diva - Chiplun Railway
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनीही प्रशासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “ही केवळ आठ डब्यांची खेळण्यातील गाडी नेमकी कोणासाठी सोडली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या, अतिरिक्त डबे आणि आरक्षित गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com