

सचिन जाधव
Pm Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येणार आहेत आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी हे पुण्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यातील रस्ते वाहतूक नियोजन कसं असेल ? याबाबत पुणे पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान तीन कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत सर्व कार्यक्रम असल्याने पोलीस प्रशासनाने अनेक रस्ते बंद ठेवल्याने सामान्य नागरिकांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (PM Modi Visit In Pune)
वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुण्यातील रस्ते वाहतूक नियोजनाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जवळपास ८०० हून अधिक वाहतूक पोलीस अधिकरी कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. संपूर्ण रस्त्यांवर बॅरिगेटिंग करण्यात आले आहे. (Pune Traffic Diversions)
'शहरातील शिवाजी रस्ता,टिळक रस्ता,फर्ग्युसन रस्ता तसेच लक्ष्मी रस्ता यासह इतर रस्ते बंद ठेवण्यात येणार नाहीत. व्हीआयपी मूव्हमेंट ज्या रस्त्याने जाणार आहे, तो रस्ता फक्त काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. (PM Narendra Modi to Visit Pune)
दरम्यान, पोलीस प्रशासनाने हॉटेल,दुकान,बँक किंवा इतर काही ठिकाणी असणारे व्यवसाय बंद किंवा त्यांना येण्यास मनाई केली नाही. या भागातील काही शाळांनी स्वतःहून सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हॉटेल दुकान यांना नोटीस दिल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू न जाता बाहेर पडावे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर पुढे म्हणाले. (PM Modi Pune Visit)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.