Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Mumbai Crime News : मुंबईत २० हून अधिक घरे असणाऱ्या किन्नरांच्या गुरुला अटक करण्यात आली आहे. किन्नरांच्या गुरुचं बांगलादेश कनेक्शन देखील उघड झालं आहे.
govandi news
Mumbai Crime NewsSaam tv
Published On
Summary

बनावट कागदपत्रांवर भारतात राहणाऱ्या किन्नर ज्योतीला अटक

किन्नर ज्योतीचे खरे नाव अयान खान, ती मूळची बांगलादेशची

तिच्याकडे २० पेक्षा जास्त घरे आणि ३०० हून अधिक भक्त असल्याचे समोर

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मूळची बांगलादेशची असलेली किन्नर ज्योती, गुरु माँ उर्फ अयान खानला अटक केली आहे. किन्नर ज्योती ही मागील ३० वर्षांपासून बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात राहत होती. पोलिसांच्या तपासात किन्नर ज्योतीचं नाव बाबू अयान खान असल्याचं समोर आलं. किन्नर ज्योतीचा मुंबईच्या गोवंडी, रफीक नगर, कुर्ला, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे या भागात वावर होता.

govandi news
Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

किन्नर ज्योतीचे ३०० हून अधिक भक्त आहेत. भक्तांमध्ये गुरु माँ म्हणून ओळखली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफीक नगर भागात अनेक बांगलादेशी किन्नरांना अटक केली. यावेळी किन्नर ज्योतीचे कागदपत्र तपासले. त्यावेळी तिच्याजवळ आधार, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे होते. त्यामुळे किन्नर ज्योतीला सोडण्यात आलं.

govandi news
Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

पोलिसांनी ज्योती किन्नरची कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी तिच्याजवळील कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती किन्नरला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात तिच्याजवळ मुंबई २० हून अधिक घरे आढळले आहेत. तिचे अनेक घरे रफीक नगर आणि गोवंडीमध्ये आहे. तिच्या घरात तिचे अनुयायी आणि भक्त राहतात. याच ज्योती किन्नरचा पर्दाफाश झाला आहे.

govandi news
Election Commission : नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

पोलिसांनी ज्योती उर्फ अयान खानच्या विरोधात पासपोर्ट कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून इतके दिवस भारतात कशी राहत होती, तिला बनावट कागदपत्रे कुणी बनवून दिले, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून किन्नर ज्योती आणि तिच्या भक्त किन्नरांची देखील चौकशी केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com