Election Commission : नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

Amaravati News : मतदार याद्यांमधून नावं गहाळ होणं तसं आता नवीन नाही....मात्र गावच्या गावं याद्यांमधून गायब झाल्याची धक्कादायक घटना घडलीय....अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात.. नेमकं प्रकरण काय आहे? मतदारांनी नेमके काय आरोप केलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
amravati news update
amravati news Saam tv
Published On

व्होटचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रानं उठवलेलं असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक दोन नव्हे तर तब्बल 20 गावांची नावं मतदार यादीतून गायब झालीयेत..नेमका काय आहे हा घोटाळ हे जाणून घेण्यासाठी साम टीव्ही पोचलंय थेट धनेगाव मध्ये.. या गावात जवळपास अडीच हजार मतदार आहेत पण हे गावच मतदार यादीतून गायब आहे..

इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे..

याचं गावातील संरपंच शशिकांत मंगळेंना मतदार याद्यांमधील हा घोळ पहिल्यांदा लक्षात आला.. आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली..

अंजनगाव सुर्जी तालुक्यातीत मतदार यादीतून कोणत्या 20 गावांची नावं गायब आहेत? पाहूयात

अंजनगाव तालुक्यातील खानमपुर पांढरी गणांमधील टाकरखेडा मोरे/ धनेगांव आणि अहमदपुर या गावाची नावं गायब आहेत... तर कापूस तळणी गणातील रौदळपुर, पोही, रत्नापुर, जवळा बुद्रुक, जवळा खुर्द, औरंगपुर , सैदापूर या गावाची नावं मतदार यादीत नाहीत... तर चौसाळा गणामधील डोंगरगाव ( तुरखेड) आणि भंडाराज गणामधील मलकापूर बुद्रुक,आडगाव खाडे, नवापूर,मासमापूर,मूर्तिजापूर घोगर्डा, हसनापूर पार्डी,शिरजगाव,कारला, निमखेड आडे , जवर्डी, धुडकी या गावची नावं ही मतदार यादीत नाहीत..

amravati news update
Metro Mumbai 3 feeder bus Service : मेट्रो प्रवास आणखी सुकर होणार; प्रवाशांसाठी फीडर बससेवा सुरू, भाडे किती रुपये असणार?

दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मतदार याद्यांमधील घोळ राज्यभर चर्चेत आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. लोकशाहीतून हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात विरोधकांनी केलाय.

दुसरीकडे वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या यांद्यामधील घोळ समोर आल्यानंतर ही प्रारूप मतदार यादी होती, अशी सारवासारव प्रशासकीय अधिकाऱ्यानं केलीय...

amravati news update
Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्याने सारवासारव केली असली तरी प्रश्न उरतो.. तो म्हणजे 3 गणातील 20 गावं मतदार यादीतून वगळण्याचं कारण काय? ही तांत्रिक चूक आहे की जाणूनबुजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव? याची उत्तर निवडणुक आयोगाला द्यावीच लागणार? त्यातच एकाच तालुक्यातील 20 गावं मतदार यादीतून गायब असतील तर संपूर्ण जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा विचार आता तुम्हीच करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com