Kasba Peth Election Result : कसब्यात भाजपला मोठा धक्का; २८ वर्षांचा बालेकिल्ला ढासाळला, रवींद्र धंगेकरांचा विजय

कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला
Kasba Chinchwad Bypoll Results
Kasba Chinchwad Bypoll ResultsSaam TV
Published On

Kasba Peth Election Result : सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल २८ वर्षानंतर कसब्यात भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. (Latest Marathi News)

Kasba Chinchwad Bypoll Results
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांनी निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल; कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मताधिक्यांनी पराभव केला आहे. कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती.

खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.

रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ , सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे. 

Kasba Chinchwad Bypoll Results
Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बालेकिल्ल्यात संजय राऊत प्रत्युत्तर देणार ?

कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. 

दरम्यान, तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com