Kasba-Chinchwad Results : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी; कोण उधळणार गुलाल? उत्सुकता शिगेला

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे.
Kasba Chinchwad Bypoll Results
Kasba Chinchwad Bypoll ResultsSaam TV

Kasba Chinchwad Bypoll Results : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी सर्वांनीच मोठा प्रचार केला होता. (Latest Marathi News)

Kasba Chinchwad Bypoll Results
Sanjay Raut News : संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल; आता काय होणार कारवाई? जाणून घ्या...

दुसरीकडे सत्ताधारी भाजपला (BJP) धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दोन्ही जागेवरील निवडणूका चांगल्याच गाजल्या होत्या. दरम्यान, आज या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार असून मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कसबा निवडणूकीत कोण मारणार बाजी?

कसबा मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. दरम्यान, निकालाआधीच स्ट्रेलिमा या संस्थेने कसब्याचा एक्झिट पोल जाहीर केला आहे.

त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. (Maharashtra Political News)

Kasba Chinchwad Bypoll Results
Pune Byelection: प्रचारादरम्यान 'कोण धंगेकर?' बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जोरदार उत्तर; कसब्यात धंगेकरांच्या विजयाचे झळकले पोस्टर्स

चिंचवडमध्ये कोण उधळणार गुलाल?

चिंचवड पोटनिवडणूकही मोठी अटीतटीची होण्याची शक्यता आहे. एकीकडे कसब्याची जागा महाविकासआघाडी जिंकणार असा अंदाज बांधला जात असताना, दुसरीकडे चिंचवडच्या जागेवर भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.

अन्न धान्य महामंडळाचे गोदाम आणि मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासह संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com