Sanjay Raut News : संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल; आता काय होणार कारवाई? जाणून घ्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi NewsSaam Tv
Published On

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊतांविरोधात आता सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणला गेला तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut's Controversial Statement : बनावट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

संजय राऊतांवर हक्कभंगाची मागणी, काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करत आहे. आज त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांसोबत संवाद साधताना महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी याच मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरलं. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. (Maharashtra Political News)

हक्कभंग कधी होतो?

खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात.

Sanjay Raut Latest Marathi News
Weather Updates : ऐन उन्हाळ्यात बरसणार पावसाच्या सरी; येत्या २४ तासांत या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.

हक्कभंग आल्यास कोणती शिक्षा होते?

विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.

आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com