Weather Updates : ऐन उन्हाळ्यात बरसणार पावसाच्या सरी; येत्या २४ तासांत या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे देशातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
Weather Updates 1 March 2023
Weather Updates 1 March 2023Saam TV
Published On

Weather Updates : फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे देशातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे. यामुळे दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Weather Updates 1 March 2023
IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने टॉस जिंकला; टीम इंडियात दोन मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडले आहेत. त्याच वेळी, डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा स्थितीत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र  (Weather Forecast) विभागाने दिली आहे.

दुसरीकडे, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह राजस्थानच्या अनेक भागात आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात हलका पाऊसही पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार,  (Weather Updates) येत्या २४ तासांत उत्तर-पश्चिम दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्ली आणि दिल्ली-एनसीआरच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचबरोबर हरियाणाच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम 28 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशांवर म्हणजेच डोंगराळ राज्यांवर होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Weather Updates 1 March 2023
Train Accident : दोन ट्रेनची समोरासमोर धडक; भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू, ८५ जखमी, थरकाप उडवणारा VIDEO

त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये २ मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २ मार्चनंतर हवामानात बदल होईल आणि ३ मार्चनंतर हवामान कोरडे होऊ लागेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ

थंडीने काढता पाय घेण्याआधीच महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. सूर्य तळपल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. गेल्या २४ तासांत अकोला येथे ३८.८. अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील ब्रह्मपूरी, वाशीम, अमरावती, वर्धा, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर सांगली, रत्नागिरी, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com