Sanjay Raut's Controversial Statement : बनावट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sanjay Raut - Eknath Shinde
Sanjay Raut - Eknath ShindeSaam TV

Kolhapur News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज (१ मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

कोल्हापुरात पोहोचताच संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ही बनावट शिवसेना आहे. हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut - Eknath Shinde
Car Garage Fire : अंबरनाथमध्ये कारच्या गॅरेजला भीषण आग; ८ ते १० गाड्या आगीच्या भक्षस्थानी

राज्यात सरकार बदलताच २८ चोरांना क्लिनचीट

“ज्या INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी लोकांकडून जाहीरपणे लाखो कोट्यवधी रुपये गोळा केले. हे पैसे आम्ही राजभवनात जमा करू असं सोमय्या यांनी सांगितलं होतं. मात्र, हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत पत्ताच लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपास यंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. गेल्या ६ महिन्यांपासून या सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे”, अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

Sanjay Raut - Eknath Shinde
Wardha Crime News : शेतातील झोपडीत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी टाकली धाड अन्..,

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांची बदनामी करायची, एवढेच उद्योग सध्या सुरू आहे. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की २०२४ मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल”.

दरम्यान, यावेळी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा ३०-३५ वर्ष भाजपाकडे होती. मात्र, यंदा ती जागा भाजपाकडून जाणार आहे. पिंपरीची जागा कोण जिंकेल, सांगता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com