Wardha Crime News : शेतातील झोपडीत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी टाकली धाड अन्..,

सावंगी पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील झोपडीला ठोकले सील
Wardha Crime News
Wardha Crime News Saam Tv
Published On

चेतन व्यास

Wardha Crime News : शेतातील एका झोपडीत सुरु असलेला देहविक्रीचा व्यवसायाचा सावंगी पोलिसांनी पर्दाफाश केला असून पीडित महिलेची सुटका करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई नागठाणा परिसरात सावंगी पोलिसांनी रात्री उशिरा केली. पोलिसांनी झोपडीला सील ठोकले.

सावंगी पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जीवन दत्तू मोहर्ले रा. रोठा वेणी ता. कळंब, जि. यवतमाळ ह.मु. सावंगी परिसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Wardha Crime News
Jalgaon News: लग्‍नासाठी सजलेल्‍या मंडपातून नववधूची अंत्‍ययात्रा; हळद लावण्यापूर्वी मुलीचे टोकाचे पाऊल

नागठाणा परिसरातील एका शेतात असलेल्या टिनपत्राच्या झोपडीत देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तेथे पाठविला. आरोपी जीवन याने वर्धा येथील रहिवासी एका ३३ वर्षीय महिलेला तेथे बोलावून बनावट ग्राहकास वेश्या व्यवसाय करण्यास उपलब्ध करुन दिले. (Crime News)

आरोपी जीवन पीडित महिलेला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे पुढे आले. अखेर सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जात आरोपीला देहविक्रीचे पैसे घेताना रंगेहात पकडले. तसेच पीडित महिलेची सुटका केली. सावंगी पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध कलम ४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.

कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस (Police) निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वात यांनी केली.आरोपी जीवन मोहर्ले हा मुळचा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील रोठा वेणी गावातील रहिवासी आहे. मात्र, काही महिन्यांपासून तो सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहत होता.

Wardha Crime News
Ajit Pawar: कसबा पोटनिवडणुकीवरुन अजित पवारांचा भाजपला इशारा, म्हणाले; 'निकाल येऊ द्या, मगं....

त्याच्यावर पोलिसांना संशय होता. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी तब्बल आठ दिवस त्याच्या प्रत्येक हालचालीवर वॉच ठेवला. तो कुठे जातो, काय करतो, याबाबतची संपूर्ण माहिती गोळा केली. अखेर येसणकर याच्या शेतातील झोपडीत देहविक्री व्यवसाय तो करीत असल्याचे समजल्याने बनावट ग्राहक पाठवून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला.

आरोपी जीवन मोहर्ले याच्याकडे बनावट ग्राहक पाठविण्यात आला होता. आरोपीने वैश्या व्यवसायासाठी पीडितेला उपलब्ध करुन देतो असे सांगितले होते. त्यानुसार एक हजार रुपयांत सौदा ठरला. पोलिसांनी दोन पाचशेच्या नोटा बनावट ग्राहकाला देऊन घटनास्थळी पाठविले. तेच पैसे ग्राहकाने आरोपीला दिले.

पोलिसांनी लगेच छापा मारुन आरोपीजवळून एक नोट आणि पीडितेजवळून दुसरी नोट जप्त करीत रंगेहात पकडले.सावंगी पोलिसांनी घटनास्थळी छापा मारुन पीडित महिला आणि आरोपीकडून १ हजार ५५० रुपये तसेच मोबाईल, एक निरोधाचे पाकीट, असा एकूण ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com