Pune By Election: प्रचारादरम्यान 'कोण धंगेकर?' बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांना जोरदार उत्तर; कसब्यात धंगेकरांच्या विजयाचे झळकले पोस्टर्स

Who is Dhangekar??? : कसबा तो सिर्फ झांकी है, कोथरुड अभि बाकी है, असं लिहून थेट चंद्रकांत पाटलांना आव्हान देखील देण्यात आलं आहे.
Ravindra Dhangekar Flex
Ravindra Dhangekar FlexSaam TV
Published On

Pune By Election Result : पु्ण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्याच्या मतमोजणीआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स पुन्हा एकदा झळकले आहे. यावेळी बॅनरच्या माध्यमातून भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान रविंद्र धंगेकर यांना कमी लेखत ‘Who is Dhangekar' कोण धंगेकर अशी विचारणा जाहीर सभेतून केली होती. याच भाषणातील मुद्द्याला धरुन महाविकास आघाडीकडून चंद्रकांत पाटलांना आता बॅनर्सच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे. (Political News)

Ravindra Dhangekar Flex
Political News : विधानसभा हक्कभंग समितीची घोषणा; ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समितीत समावेश नाही

राष्ट्रवादीने लावलेल्या बॅनर्सवर लिहिलंय की, ‘Who is Dhangekar'.. लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीच्या लढाईत हुकूमशाहांच्या बालेकिल्ल्यात त्यांना चारी मुंड्या चीत करणारा शिवरायांचा मावळा... आमदार रविंद्रभाऊ धंगेकर. कसबा तो सिर्फ झांकी है, कोथरुड अभि बाकी है, असं लिहून थेट चंद्रकांत पाटलांना आव्हान देखील देण्यात आलं आहे.

Ravindra Dhangekar Flex
WPL 2023 : मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, धडाकेबाज खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

कशी पार पडेल मतमोजणी?

उद्या सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे.

सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स ची पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com