Kalyan Politics : विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा

Kalyan Thackeray Group News : कल्याणमध्ये विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पदाधिकऱ्यांनी अंतर्गत वाद थेट उद्धव ठाकरेंसमोर पत्राद्वारे मांडला आहे.
विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा
Kalyan Politics :Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्या असतानाच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यामध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत आहे. 'पक्षातील नेत्यांमधील गटबाजीमुळे निष्ठावंत शिवसैनिक भरडला जातोय, त्यामुळे ही गटबाजी लवकर दूर करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पत्रातून ठाकरेंना केली आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे .

विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत चार विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर या मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू असल्याने या संधीचा फायदा उचलण्यासाठी ठाकरे गट सरसावला आहे. ठाकरे गटाकडून देखील या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा
Kalyan Travel Places : मनाला भुरळ घालणारे सौंदर्य, कल्याणमध्ये कुटुंबासोबत एन्जॉय करा 'ही' खास डेस्टिनेशन्स

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?

या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे. मात्र ठाकरे गटातील सुरु असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील सात विभाग प्रमुखांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात कशा प्रकारे पक्षात गटबाजी सुरु आहे. पक्षातील वरिष्ठ नेते एकमेकांविरोधात गटबाजी करत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक भरडला जात आहे. या गटबाजीचा फटका विधानसभा निवडणूकीत बसू शकतो. विधानसभा मतदारसंघामधील विभाग प्रमुखांना विश्वात न घेता निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही गटबाजी संपवा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

विधानसभेआधी ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा
BJP Video : भाजप 160 जागा लढवण्यावर ठाम ? मोठी माहिती आली समोर

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची शिंदे गटावर टीका

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. 'राजकीय लढाई संजय राऊत लढत आहेत. घाबरलेले आणि बिथरलेले लोक हे त्यांना अटक करण्याच्या मागे लागले आहे. त्यांना माहिती आहे की, संजय राऊत हे लढाई लढताहेत, ती लढाई लढण्याची हिंमत या गिधाडांमध्ये नव्हती. त्यामुळे पक्ष सोडून गेले, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांनी शिंदे गटावर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com