Kalyan Road Traffic News: कल्याण स्टेशन परिसरात १० दिवस वाहतुकीत बदल, काय आहे कारण?

Kalyan Road Traffic Update: कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
Kalyan Road Traffic News:
Kalyan Road Traffic News:Google
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Road Traffic News in Marathi:

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत पुढील दहा दिवस बदल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

वाहतुकीत काय बदल होणार?

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचं काम सुरू होत असल्याने वल्ली पीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


Kalyan Road Traffic News:
Ranichi Baug News : राणीच्या बागेत चिमुकल्या पावलांचं नामकरण! पेंग्विनने दिला तीन पिल्लांना जन्म

भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छित स्थळी जातील. तर कल्याण रेल्वे स्टेशन कडून वल्लीपूर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल आणि अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे .

Kalyan Road Traffic News:
Marathi Patya in Mumbai : मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक; BMC अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, अधिकारी रस्त्यावर उतरणार

साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावे वळण घेऊन ही वाहने गुरुदेव हॉटेलमार्गे येथे स्थळी जातील, तर भानू सागर टॉकीजकडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावे वळून घेऊन गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमीमार्गे येथे इच्छितस्थळी जातील, अशी माहिती वाहतूक विभागाचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली.

Kalyan Road Traffic News:
Thane Fire News: ठाण्यात अग्नितांडव! बंगल्याला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, तीन जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com