Ranichi Baug News : राणीच्या बागेत चिमुकल्या पावलांचं नामकरण! पेंग्विनने दिला तीन पिल्लांना जन्म

Penguin News : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. हे भायखळा ईस्टमध्ये असुन त्याला राणीची बाग म्हणूनही ओळखलं जातं.
Ranichi Baug News
Ranichi Baug NewsSaam Tv
Published On

Veermata Jijabai Bhosale :

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. हे भायखळा ईस्टमध्ये असुन त्याला राणीची बाग म्हणूनही ओळखलं जातं. या राणीच्या बागेत अनेक पक्षी, प्राणी (Animal) आणि वनस्पती आढळतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्राणी संग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणले. तेव्हा पेग्विनची संख्या 8 होती. ही गोष्ट संपूर्ण मुंबईसह (Mumbai) देश विदेशातल्या लोकांसाठी आकर्षण बनले. या प्राणी संग्राहलयात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली.

दररोज पेंग्विनला पाहण्यासाठी पाच ते सहा हजार लोकांची गर्दी होत असे. तसेच सुट्टीच्या दिवशी 15 ते 16 हजार लोकांची गर्दी पाहायला मिळते. याशिवाय दर शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या 20 हजारापर्यंत जाते.

Ranichi Baug News
Winter Travel Place: मौसम मस्ताना रस्ता अंजना, गुलाबी थंडी अन् हिमालयातील प्रसिद्ध स्थळे

गेल्या अडीच वर्षांत पेंग्विनची संख्या वाढली आहे. अलीकडेच तीन पेंग्विनचा जन्म (Born) झाला आहे. त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. मोल्ट-फ्लिपरचे बाळ कोको (मादी); पोपॉय-ऑलिव्हचे बाळ स्टेला (मादी); डोनाल्ड-डेझीचे बाळ जेरीचे (नर) अशी नावे ठेवण्यात आली आहेत. आणि आता त्यामुळे पर्यटकांमध्ये बेबी पेंग्विन पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी उत्सुकता दिसून येईल.

Ranichi Baug News
Best Places To Visit Near Mumbai | मुंबई जवळील या सर्वोत्तम हिलस्टेशनला नक्कीच भेट द्या!

राणीबाग प्राणी संग्रहालयाचे सरासरी उत्पन्न प्रतिदिवस 1.5 लाख आहे. तर महिन्याचे सरासरी उत्पन्न 45 लाखांपर्यंत पोहोचले आहे. या दरम्यान, राणीच्या बागेत नुकत्याच तीन पेंग्विनचा जन्म झाला असून त्यांचे नामकरण आज झाले आहे. या खास गोष्टीमुळे पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com