World Animal Welfare Day 2023 : जागतिक प्राणी दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

World Animal Day : हा दिवस जगभरातील प्राण्यांच्या कल्याणासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
World Animal Welfare Day 2023
World Animal Welfare Day 2023Saam Tv
Published On

Animal Welfare Day :

मानवी जीवन मुख्यत्वे प्राण्यांवर अवलंबून आहे आणि त्यांच्याशी जोडलेले देखील आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील परस्परावलंबन याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो. हा दिन एक वार्षिक कार्यक्रम आहे, जो दरवर्षी 04 ऑक्टोबर रोजी होतो. हा दिवस जगभरातील प्राण्यांच्या कल्याणासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.

World Animal Welfare Day 2023
National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळेल?; संसदेत भाजप खासदाराच्या प्रश्नाला सरकारनं दिलं उत्तर

इतिहास

जागतिक प्राणी (Animal) दिनाची सुरुवात 1925 मध्ये झाली. हेनरिक झिमरमन यांनी बर्लिनमध्ये अशा प्रकारचा पहिला उत्सव आयोजित केला. यानंतर हा दिवस जागतिक कार्यक्रमात विकसित झाला जो सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील लोक साजरे (Celebrate) करतात. या निमित्ताने जगभरात दरवर्षी कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये छोट्या-मोठ्या मेळाव्यांपासून ते मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्सवांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.

महत्त्व काय?

हा दिवस लोकांना एकत्र येण्याची आणि प्राणी कल्याणासाठी पाठिंबा दर्शवण्याची संधी देतो. आपल्या सभोवतालच्या प्राण्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात (Life) कोणत्या अडचणी आणि संकटांना तोंड द्यावे लागते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या दिवशी आपण प्राण्यांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष देतो आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी कोणती पावले उचलता येतील हे ठरवतो.

World Animal Welfare Day 2023
Street Free Animals: जीव मुठीत घेऊन जगतायत अकोल्यातील नागरिक; रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट

थीम

'मोठा असो वा छोटा, आम्ही सर्वांवर प्रेम करतो'. या थीमचा उद्देश पशुवैद्य, पशुवैद्यकीय संघटना आणि इतरांच्या दृष्टीने विचार आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी प्रयत्न वाढवणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com