Street Free Animals: जीव मुठीत घेऊन जगतायत अकोल्यातील नागरिक; रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट

Animals News: मनपा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
Street Free Animals
Street Free AnimalsSaam TV

Akola News:

अकोला शहरातील विविध रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. गर्दीच्या मुख्य रस्त्यांवर ही जनावरे ठाण मांडून बसतात परिणामी वाहतुकीला खोळंबा होतो. त्याचबरोबर अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. मनपा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

शहरातील प्रत्येक मार्गावर हीच परिस्थिती आपल्याचं पाहायला मिळत आहे. मनपाचा कोंडवाडा विभाग पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर जनावरांचा झुंड बसलेला आढळून येत आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण तर होतोच आहे. अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महानगरपालिकेच्या विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Street Free Animals
UP Crime News: जन्मदात्या बापाचे सैतानी कृत्य! दुसरे लग्न करण्यासाठी दिली लेकाच्या हत्येची सुपारी

मनपा अधिकारी सांगतात की आम्ही मोहीम सुरु केली असून, नागरिकांना सुद्धा आव्हान करण्यात आले आहे की आपली मोकाट जनावरे ही बांधून ठेवावी अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल.

मोकाट जनावरे आणि रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकटे असल्यास भटके कुत्रे माणसांवर हल्ला करतात. कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांना इजा झाल्यात.

Street Free Animals
King Cobra In Pillow: उशीखाली लपला होता किंग कोब्रा; तरुण बिछान्यावर झोपताच फना काढला अन्..., थरारक VIDEO VIRAL

काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन महिलांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. मोकाट गायी, बैल यांच्या हल्ल्यात देखील अनेक व्यक्ती आतापर्यंत जखमी झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com