King Cobra In Pillow: उशीखाली लपला होता किंग कोब्रा; तरुण बिछान्यावर झोपताच फना काढला अन्..., थरारक VIDEO VIRAL

King Cobra Viral Video: घटनेमुळे उपस्थित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली.
King Cobra In Pillow
King Cobra In PillowSaam TV
Published On

Rajasthan News:

राजस्थानमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. झोपण्यासाठी एक व्यक्ती आपल्या बिछान्याजवळ आला आणि त्याने उशी बाजूला सरकवली तेव्हा उशीखाली त्याला विशाल किंग कोब्रा साप दिसला. या घटनेमुळे उपस्थित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली. सरद घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा येथे ही घटना घडली आहे. येथे एका खोलीत सफेद रंगाच्या गाद्या आणि उशा ठेवल्या होत्या. रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने गाद्यांवरील उशी दूर केली तेव्हा तेथून झपकन एक भयावह किंग कोब्रा फना काढून उभा राहिला.

King Cobra In Pillow
Rajeshwari Kharat Viral Video: काळी चिमणी घावली लका, फॅन्ड्रीतील 'शालू'च्या दिलखेचक अदा पहिल्यात का?

भामशाह मंडीमधील एका दुकानात ही घटना घडली आहे. दुकानात ठेवलेल्या बिछान्यात साप लपलेला असेल याची त्या व्यक्तीला काहीच कल्पना नव्हती. किंग कोब्रा पाहून त्याच्या पायाखलची जमिनच सरकली. खोलीत असलेले इतर मुलं देखील आपला जीव वाचवण्यासाठी धावत बाहेर आले. त्यानंतर साप पकडणाऱ्या व्यक्तीला त्यांनी बोलावले.

सर्प मित्राने मोठ्या चलाखीने विशाल किंग कोब्रा पकडला आहे. हा किंग कोब्रा तब्बल ५ फुटांहून जास्त मोठा होता. सर्पमित्राने साप पकडल्यानंतर त्याला निसर्ग अधिवासात सोडून दिले. गर्मिचे वातावरण असल्याने शिकारीच्या शोधात साप जंगलाबाहेर पडतात. अशावेळी माणसांनी आपली व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. कारण किंग कोब्राच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे.

King Cobra In Pillow
Shiv Thakare Viral Video:‘तुम्ही बिग बॉसमधल्या शिवसारखे दिसता...’ चिमुकल्या चाहत्याच्या प्रश्नावर शिवचे मजेशीर उत्तर; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com