Shraddha Thik
मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी ठिकाणांच्या पर्यायांची कमतरता नाही. मुंबईपासून जवळ अप्रतिम हिल स्टेशन्स आणि पर्यटन स्थळे आहेत.
या हिल स्टेशन्सचे सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे, जे पाहून तुम्हाला येथून परत घरी जावेसे वाटणार नाही.
लोणावळा हे सुंदर हिल स्टेशन मुंबईपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर आहे.
तसेच लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर भव्य नैसर्गरम्य दृश्यासाठी खंडाळा हिल स्टेशन प्रसिद्ध आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हिल स्टेशन मुंबईपासून फक्त 120 किलोमीटर अंतरावर आहे.
मुंबईपासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.
तुम्ही मुंबईजवळील माळशेज घाटावर सहलीचा प्लॅन करू शकता, मुंबईपासून या सुंदर हिल स्टेशनचे अंतर 125 किलोमीटर आहे.