Kalyan : ACP च्या ऑफिसमध्ये शिरला कोब्रा, विषारी सापाला पाहून पोलिसांची धांदल उडाली

Kalyan ACP Police Office Indian Cobra Snake News : कल्याण येथील ACP कार्यालयात साडेपाच फुटांचा विषारी इंडियन कोब्रा शिरल्याने कर्मचारी घाबरले. सर्पमित्रांनी वेळीच नागाला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
Kalyan : ACP च्या ऑफिसमध्ये शिरला कोब्रा, विषारी सापाला पाहून पोलिसांची धांदल उडाली
Kalyan ACP Police Office Indian Cobra Snake NewsSaam tv
Published On
Summary
  • ACP कार्यालयात साडेपाच फुटांचा इंडियन कोब्रा आढळला

  • महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्धा तास खोलीत आश्रय घेतला

  • सर्पमित्रांच्या वेळीच रेस्क्यूमुळे मोठा अनर्थ टळला

  • नागाला वन विभागाच्या ताब्यात देऊन जंगलात सोडणार

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये काल दुपारी धक्कादायक प्रकार घडला. कल्याण एसीपी कार्यालय येथे साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी तब्बल अर्धा तास स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नागाला पकडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या ACP कार्यालयात काल दुपारच्या सुमारास अचानक साडेपाच फुटांचा इंडियन कोब्रा शिरल्याने कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. नकळत कार्यालयात घुसलेल्या या अतिविषारी नागामुळे कर्मचारी घाबरले. विशेषतः एका खोलीत काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ दरवाजा बंद करून स्वतःला सुरक्षित ठेवत तब्बल अर्धा तास आतमध्येच कोंडून घेतले.यानंतर हा नाग ACP यांच्या मुख्य कक्षाच्या दिशेने सरकत असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी खोलीबाहेर पडत सुरक्षित स्थळी धाव घेतली.

Kalyan : ACP च्या ऑफिसमध्ये शिरला कोब्रा, विषारी सापाला पाहून पोलिसांची धांदल उडाली
Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

सुदैवाने घटनेच्या वेळी ACP कार्यालयात उपस्थित नव्हते.घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अत्यंत दक्षतेने या अतिविषारी नागाचा रेस्क्यू केला. त्यानंतर नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Kalyan : ACP च्या ऑफिसमध्ये शिरला कोब्रा, विषारी सापाला पाहून पोलिसांची धांदल उडाली
Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

सर्पमित्रांनी सांगितले की, 20 वर्षांच्या अनुभवात इतक्या गजबजलेल्या कार्यालयात असा मोठा आणि विषारी नाग निघणे दुर्मिळ आहे. हा नाग कार्यालयात नेमका कसा शिरला, हा आम्हालाही पडलेला प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. स्टेशनलगतच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही घटना काही काळासाठी खळबळजनक ठरली. मात्र सर्पमित्रांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com