Central Railway: कल्याण-कसारा रेल्वेसेवा ठप्प; वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तास लागण्याची शक्यता

Kasara-Kalyan Railway Service Stopped : ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले असून स्टेशनवर मोठी गर्दी जमत आहे.
Kasara-Kalyan Railway Service Stopped
Kasara-Kalyan Railway Service StoppedSaam TV

फय्याज शेख

मुंबई: मध्य रेल्वेची कसारा ते कल्याण वाहतूक सेवा (Railway Service) ठप्प झाली आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही मालगाडी रेल्वे रुळावरच उभी आहे. त्यामुळे कसाऱ्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक बंद आहे. अशात कसाऱ्याहून (Kasara) कल्याणकडे (Kalyan) निघालेली लोकल ट्रेन उंबरमाळी स्टेशनला उभी आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तास लागण्याची शक्यता आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले असून स्टेशनवर मोठी गर्दी जमत आहे. (Mumbai Local Train News)

पाहा व्हिडिओ -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com