अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

Illicit Affair Killed Kalyan Accused Arrested Jharkhand: कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी झारखंडमधून अटक केली.
Accused arrested by Kalyan police in Jharkhand while attempting to flee to Nepal after alleged murder.
Accused arrested by Kalyan police in Jharkhand while attempting to flee to Nepal after alleged murder.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका महिलेची हत्या करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना अवघा वीस मिनिटांचा उशीर झाला असता तर आरोपी नेपाळमध्ये फरार झाला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Accused arrested by Kalyan police in Jharkhand while attempting to flee to Nepal after alleged murder.
कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

27 एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेतील एका घरात गुड्डू देवी या महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासात गुड्डू देवी आणि आरोपी बम बम कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. मात्र काही दिवसांपासून गुड्डू देवी यांनी आरोपीशी बोलणे बंद केल्याने बम बम कुमार संतापला होता. याच रागातून आरोपी बम बम कुमार हा गुड्डू देवी यांच्या घरी गेला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने गुड्डू देवी यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यानंतर तो झारखंडला पळून गेला.

Accused arrested by Kalyan police in Jharkhand while attempting to flee to Nepal after alleged murder.
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात कोयत्याने सपासप वार, नंतर दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रुग्णालयात उपचार सुरू असताना 11 मे रोजी गुड्डू देवी यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने मोबाईल बंद केल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने आरोपीच्या मूळ गावाचा पत्ता शोधून काढला. डीसीपी अतुल झेंडे एसीपी अशोक होनमाने आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक झारखंडमधील गोंडा जिल्ह्यात दाखल झाले.

Accused arrested by Kalyan police in Jharkhand while attempting to flee to Nepal after alleged murder.
Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली. आरोपी बम बम कुमार याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी भूषण देवरे करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत गुड्डू देवी यांना दोन मुले असून आरोपी बम बम कुमार यालाही एक मुलगी आहे. तसेच दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती नातेवाईकांनाही असल्याचे तपासात उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com