कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

Five Stray Dogs Killed In Kalyan KDMC Sterilization Centre Case: कल्याणमध्ये पाच भटक्या कुत्र्यांची क्रूरपणे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी केडीएमसीच्या कंत्राटदार आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bodies of five stray dogs found dumped in a drain in Kalyan, triggering outrage and police action against KDMC-linked officials.
Bodies of five stray dogs found dumped in a drain in Kalyan, triggering outrage and police action against KDMC-linked officials.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये पाच भटक्या कुत्र्यांना क्रूरपणे ठार मारून त्यांचे मृतदेह नाल्यात फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केडीएमसीच्या खाजगी श्वान निर्बीजीकरण केंद्राचा कंत्राटदार आणि व्यवस्थापकाविरोधात बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे.

Bodies of five stray dogs found dumped in a drain in Kalyan, triggering outrage and police action against KDMC-linked officials.
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात कोयत्याने सपासप वार, नंतर दगडाने ठेचून तरुणाची हत्या

काही दिवसांपूर्वी एका नाल्यात पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. प्राणी मित्र संघटनांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या खाजगी श्वान निर्बीजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनीच हा अमानुष प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी निर्बीजीकरण केंद्र चालविणारा कंत्राटदार अमित सावंत आणि मॅनेजर उमेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bodies of five stray dogs found dumped in a drain in Kalyan, triggering outrage and police action against KDMC-linked officials.
Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

भटक्या कुत्र्यांना कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया न करता क्रूरपणे मारून त्यांचे मृतदेह नाल्यात फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे प्राणी कल्याण आणि महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गंभीर प्रकरणात केडीएमसी प्रशासन संबंधितांवर कोणती प्रशासकीय कारवाई करणार, तसेच संबंधित कंत्राट रद्द होणार का याकडे आता नागरिकांसह प्राणीप्रेमी संस्थांचे लक्ष लागले आहे.

Bodies of five stray dogs found dumped in a drain in Kalyan, triggering outrage and police action against KDMC-linked officials.
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

भरदिवसा घरफोडी, एक्झॉस फॅन उचकटून घरात केला प्रवेश, १३ लाखांचा ऐवज लंपास

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक घरांना कुलूप लावून बाहेरगावी जात असताना कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच कल्याणच्या वालधुनी परिसरात भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा एक्झॉस फॅन उचकटून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा तब्बल १३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com