कल्याणमधील प्रशासनाच्या कारवाईचा मुद्दा दिल्लीत गाजणार? बुद्धभूमी फाउंडेशनची होणार राहुल गांधींसोबत चर्चा

kalyan buddhabhumi foundation case : कल्याणमधील प्रशासनाच्या कारवाईचा मुद्दा दिल्लीत गाजण्याची शक्यता आहे. बुद्धभूमी फाउंडेशनची राहुल गांधींसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कल्याणमधील प्रशासनाच्या कारवाईचा मुद्दा दिल्लीत गाजणार? बुद्धभूमी फाउंडेशनची होणार राहुल गांधींसोबत चर्चा
Published On
Summary

कल्याण बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात काँग्रेस आक्रमक

राहुल गांधींसोबतही होणार चर्चा

काँग्रेसच्या कांचन कुलकर्णींनी दिली माहिती

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमधील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडीदरम्यान प्रस्तावित चारपदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान उद्भवलेल्या बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. काँग्रेस पक्षाने या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची चर्चा थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतही होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या केडीएमसी गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील काही बुद्धमूर्ती आणि भिमकोरेगाव प्रतिकृती स्तंभ, इतर साहित्य झाडे हटविताना अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.

केडीएमसी आयुक्तांनी या आरोपांचे खंडन करत कारवाई पूर्णपणे नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे.कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नसून बुद्धभूमी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे तसेच पुढेही संवाद सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याणमधील प्रशासनाच्या कारवाईचा मुद्दा दिल्लीत गाजणार? बुद्धभूमी फाउंडेशनची होणार राहुल गांधींसोबत चर्चा
Kalyan : चार पदरी पुलाच्या कामावरून वाद पेटला; KDMC च्या कारवाईदरम्यान उडाला मोठा गोंधळ, नेमकं कारण काय?

या प्रकरणावर पत्रकार परिषद घेण्याची बुद्धभूमी फाउंडेशनची तयारी होती. मात्र ती स्थगित करण्यात आली असून ५ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर पुढील रूपरेषा ठरणार असल्याची माहिती आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या प्रकरणात उडी घेतली आहे.

काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदन सादर करत विकासकामांसाठी कारवाई आवश्यक असली तरी धार्मिक आणि सामाजिक भावनांशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कारवाईदरम्यान घडलेल्या प्रकाराचा काँग्रेसने निषेध करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कल्याणमधील प्रशासनाच्या कारवाईचा मुद्दा दिल्लीत गाजणार? बुद्धभूमी फाउंडेशनची होणार राहुल गांधींसोबत चर्चा
१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

याशिवाय, ६ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचेही कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणाला आता अधिक राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com