संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरात नाल्यांच्या समस्येने नागरिक बेजार झाले आहे दर पावसाळ्यात नाले तुडुंब भरल्याने नाल्यातील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते नागरिकांना याचा नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो. अडवली-ढोकळी परिसरात नाल्यांच्या समस्येवरून शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई आणि नव्या नाल्यांच्या कामांना सुरुवात न झाल्यास नागरिकांसह केडीएमसी आयुक्त दालनात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
अडवली-ढोकळी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होते. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, तसेच घरांमध्ये पाणी शिरून आर्थिक नुकसानही होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासोबत परिसराची पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यादरम्यान कुणाल पाटील यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना पुष्पगुच्छ देत आता तरी आमच्या नाल्यांची समस्या सोडवा आणि नव्याने नाले उभारण्याचे काम तातडीने सुरू करा,अशी मागणी केली. तसेच, पावसाळ्यात पुन्हा नागरिकांना त्रास झाला तर आम्ही नागरिकांसह केडीएमसी आयुक्त दालनात जाऊन तीव्र आंदोलन करू,असा इशाराही त्यांनी दिला.यावर शहर अभियंता अनिता परदेशी यांनी या कामासाठी डीपीआर तयार करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.