Dombivli : डोंबिवलीत रेल्वे फाटकावर दुर्दैवी अपघात, रेल्वेनं व्यक्तीला उडवले, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Railway Crossing Accident CCTV Viral Video : डोंबिवलीत रेल्वे फाटकावर रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
railway
railway Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्यूज/डोंबिवली

Dombivli railway crossing accident video : मध्य रेल्वेच्या कथित निष्काळजीपणामुळे डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटक येथे काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित व्यक्ती कामावरून घरी परतत असताना मोठागाव रेल्वे फाटक बंद होते. त्यावेळी फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने तात्काळ सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोठागाव रेल्वे फाटक परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असून, रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना वारंवार जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुळेच एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

railway
Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

या घटनेची गंभीर दखल घेत भाजपा नेते दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्याचबरोबर, "नागरिकांनीही फाटक ओलांडताना काळजी घ्यावी, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे. मोठागाव रेल्वे फाटक परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

railway
PM मोदींना प्रश्न विचारणारी 'ती' परदेशी पत्रकार अडचणीत! फेसबुक-इन्स्टा अकाऊंट अचानक सस्पेंड, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com