Kalyan Crime News : हॉर्न वाजवण्यावरून वाद, गाडी फोडली, पिस्तूल काढलं अन्...; कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Kalyan Crime News in Marathi : हॉर्न वाजवण्यावरून धक्कादायक प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉर्न वाजवण्यावरून गाडी फोडली आणि पिस्तूल काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून गाडी काच फोडली इतकेच नव्हे तर पिस्तूल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली सागाव परिसरात घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे . या प्रकरणानंतर तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे जनार्दन भोईर हे त्यांच्या पत्नीसह 20 ऑक्टोबर रोजी याच परिसरातून गाडीने घरी परतत होते. त्यावेळी गाडी समोर दोन जण आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. याच हॉर्न वाजवण्यावरून जनार्दन भोईर आणि या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वाद घालणाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास जनार्दन भोईर यांच्या कारच्या काचा फोडल्या.

Kalyan Crime
Jalgaon Crime : सेनेत भरतीचे आमिष दाखवून ९ तरुणांची फसवणूक; नाशिकच्या चौघांविरुद्ध गुन्हा

दोघे ओळखीचे असल्याने जनार्दन भोईर यांचा भाऊ निलेश दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाब विचारण्यात गेले. या दोघांनी पुन्हा निलेश भोईर यांच्या इमारतीत जाऊन निलेश भोईर यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर निलेश यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी आरडाओरड केल्याने या दोघांनी तिथून पळ काढला.

शेजारच्या इमारतीत पळून गेले. त्यांनी पिस्तूल आणि हत्यारही एका बॅगमध्ये भरून ती बॅग शेजारील इमारतीमध्ये ठेवली होती. आसपासच्या नागरिकांनी या दोघांना पकडून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतलं. त्या इमारतीमधील बॅग शोधत बॅगेतील तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस ताब्यात घेतली.

Kalyan Crime
Ambarnath Crime : जमिनीच्या वादातून इस्टेट एजंटची हत्या; अंबरनाथमधील घटनेचा काही तासातच उलगडा!

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत निर गुटेला आणि नितेश गुप्ता या दोघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार पसार झाले असून फरार आरोपींमधील दोन जण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com