

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...
Kalyan Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. दहशत माजवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण (Kalyan) पश्चिम येथील काळातलाव परिसरात दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही काळातलाव परिसरात चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीच्या शोधात आले होते.
यावेळी त्यांनी चंदनचा पत्ता विचारला मात्र तो सांगण्यास नकार दिल्याने दीपक साळवी नावाच्या तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरातील गाड्यांचीही तोडफोडही केल्याचे समोर आले आहे. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांचा धिंगाणा सुरू होता.(Crime News)
दरम्यान, विवेक व प्रथमेश हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांचा चंदन नावाच्या व्यक्तीशी जुना वाद आहे. याच वादातून चंदनला शोधण्यासाठी काल हे दोघे त्या ठिकाणी आले होते. भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.