कल्याणमध्ये लुडो गेमच्या वादातून हत्या
अल्पवयीन मामाकडून भाच्याचा खून
झोपेत असताना चाकूने हल्ला
खडकपाडा पोलिसांकडून आरोपी ताब्यात
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan Gokul Nepali Murder Case News कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर लुडो गेम खेळण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अल्पवयीन मामाने आपल्या भाच्याची चाकूने हत्या केली आहे. ही भीषण घटना खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव गोकुळ नेपाळी (Gokul Nepali) असे असून तो आपल्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ आणि त्याचा अल्पवयीन मामा यांच्यात मोबाईलवर लुडो गेम (Ludo Game Tragedy Kalyan ) खेळण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. रात्री गोकुळ झोपेत असताना अल्पवयीन मामाने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात गोकुळ गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घरातील इतर सदस्यांना ही घटना लक्षात येताच आरडाओरडा झाला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले होते. घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे कल्याण (Kalyan Murder) परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.