

कल्याण- डोंबिवलीमध्ये फेरीवाला मुद्दा तापला
नगरसेवकांकडून कडक कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांवर हल्ला झाला आता ते आम्हाला पण मारतील
स्टेशन आणि शाळा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मागणी
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फेरिवाल्यांच्या मुजोरीचा मुद्दा चांगलाच गाजला. फेरिवाल्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली यावरून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. फेरिवाल्यांनी अधिकाऱ्यांना मारले आता ते आम्हाला पण मारणार. केडीएमसी आयुक्त, महापौर आणि सभापतींनी काहीतरी करावे, अशी विनवणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत केली. आता या फेरिवाल्यांविरोधात पालिकेकडून काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे राहिल.
फेरीवाले अधिकाऱ्यांना मारत आहेत आता ते आम्हालाही मारतील. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास आहे. महापौर आयुक्त चेअरमन हा फेरीवाला प्रकरण गांभीर्याने घ्या. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक किरण भागले यांनी महासभेत आपली व्यथा मांडली. तर मी मॅनेज झाले अशा दुश्प्रचार प्रचार करण्यात आला, शिवसेना शिंदे गट नगरसेविका प्रमिला पाटील देखील आक्रमक झाल्या. शिवसेनेची सत्ता असताना पाण्यासाठी, फेरीवाल्यांसाठी नगरसेवकांना विनवणी करावी लागत आहे ही मोठी खेदाची बाब आहे.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेची महासभा पाणी आणि फेरीवाल्यांमुळे चांगलीच गाजली. पाणी प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आक्रमक दिसले तर दुसरीकडे फेरीवाल्यांबद्दल शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक देखील आक्रमक पहायला मिळाले. फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई दिसत नसल्याचे विधान केडीएमसी महासभेत करण्यात आले.
यावेळी शिंदे गटाचे नगरसेवकांनी स्टेशन परिसर, बिर्ला कॉलेज परिसर आणि ज्या परिसरात चार ते पाच शाळा आहेत तो परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मागणी केली. ही मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जात आहे मात्र फेरीवाले हटत नाही उलट नगरसेवकांवरच दबाव टाकला जातोय असा गंभीर आरोप करण्यात आला. मुजोर फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा अशी मागणी शिंदेंच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.