Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात; KDMCच्या घंटा गाडीने चिरडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Kalyan Accident News : कल्याण ग्रामीणमधील वसार गावात घंटा गाडीच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षीय शिवम राठोडचा दुर्दैवी मृत्यू. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
TRAGIC DEATH OF 2-YEAR-OLD IN KALYAN AFTER GARBAGE TRUCK ACCIDENT
TRAGIC DEATH OF 2-YEAR-OLD IN KALYAN AFTER GARBAGE TRUCK ACCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • वसार गावात 2 वर्षीय मुलाचा घंटा गाडीखाली मृत्यू

  • चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप

  • नागरिकांकडून संताप आणि आंदोलनाची शक्यता

  • पोलिसांकडून तपास सुरू, कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण ग्रामीणमधील वसार गावात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षीय मुलाला केडीएमसीच्या घंटा गाडीने चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव शिवम राठोड असे आहे. या घटनेने केवळ राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम आपल्या घरासमोर खेळत होता. त्या वेळी कचरा उचलण्यासाठी आलेल्या गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत शिवमला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, शिवमचा जागीच मृत्यू झाला. शिवमचे आई वडील मोलमजुरी करून संसार चालवतात. काही क्षणांपूर्वी हसणारा, खेळणारा चिमुकला अचानक निघून गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TRAGIC DEATH OF 2-YEAR-OLD IN KALYAN AFTER GARBAGE TRUCK ACCIDENT
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

केडीएमसीकडील कचरा उचलण्याचे काम एका खाजगी कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र या गाड्यांच्या चालकांकडून निष्काळजीपणे वाहन चालवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. यापूर्वीही अशा कचरा गाड्यांमुळे अनेक अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

TRAGIC DEATH OF 2-YEAR-OLD IN KALYAN AFTER GARBAGE TRUCK ACCIDENT
Shocking : शिक्षकाने विद्यार्थिनीला झाडू मारण्याच्या बहाण्याने बोलावलं; अश्लील व्हिडिओ दाखवून केला लैंगिक अत्याचार, जळगावात खळबळ

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. शिवमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आपल्या चिमुकल्याला गमावलेल्या आईने आक्रोश करत न्यायाची मागणी केली आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर केडीएमसीच्या कंत्राटी कचरा वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com