Barsu Refienry Protest: मोडेन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव, आंदोलन हलक्यात घेऊ नका; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. मोडेन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे.
jitendra awhad
jitendra awhad saam tv
Published On: 

Political News: बारसू सोलगाव पंचक्रोशीतील १०० टक्के नागरिकांना त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरीला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी ३ महिन्यापूर्वी माझी भेट घेतली होती. अशा आशयाचं ट्विट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये रिफायनरी प्रकल्पातील परिस्थितीच सांगितली आहे. बारसू सोलगाव पंचक्रोशीतील 100 टक्के नागरिकांनी त्या ठिकाणी येणाऱ्या रिफायनरीला विरोध केला आहे. तेथील गावकऱ्यांनी 3 महिन्यापूर्वी माझी भेट घेतली होती. त्या गावामधील जवळ जवळ 500-700 स्वतःच्या बोटी घेऊन मासेमारीला जाणारी लोक आहे. (Latest Marathi news)

jitendra awhad
Pune News: मुळशीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीची 57 लाखांची दारु जप्त

गावामधील 100 टक्के लोकांनी या रिफायनरी (Barsu Refinery Survey) प्रकल्पाला विरोध केला आहे. याच प्रकरणातून विरोधातील लोकांचे समर्थन करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. गावामधील 100 टक्के लोकांचा जर विरोध असेल आणि ग्रामपंचायतीने देखिल विरोधात ठराव केला असेल तर तो प्रकल्प तिथे होऊ देऊ नका असे कायद्यात म्हटले आहे. तरी देखिल जोरजबरदस्ती करून तो प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. दरम्यान शशिकांत वारिशे यांची काही महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली हा उल्लेख देखील त्यांनी ट्विट मध्ये केला आहे. (Ratnagiri News)

jitendra awhad
India Weather Update: उकाड्यातून होणार सुटका! देशातील अनेक राज्यात कोसळणार पावसाच्या सरी; महाराष्ट्रातल्या 'या' भागांना ऑरेंज अलर्ट!

यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत? ही माहिती बाहेर आली ती मोठी धक्कादायक आहे. स्थानिकांचाच हा प्रकल्प राबवायला विरोध आहे. त्यांची मागणी आहे की, त्या ठिकाणी उत्कृष्ट आयटी पार्कची निर्मिती करावी. स्थानिकांना जे पाहिजे ते तिथे द्यायला हवं. त्यांच्या व्यथांचा सरकारने विचार करावा. असं डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. (Political News)

5000 लोक माळराणावर बसले आहेत हे कोकणचे (Kokan) आंदोलन आहे. कोकणी माणूस किती चिवट आहे ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. मोडेन पण वाकणार नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे. आंदोलन हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी ट्विट करत दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.