Jitendra Awhad News: श्रीरामावरील वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, आव्हाडांच्या बंगल्यासमोर केलं महाआरती आंदोलन

Jitendra Awhad Controversial Statement: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
jitendra awhad controversial statement about lord ram Party worker of Ajit Pawar group protested
jitendra awhad controversial statement about lord ram Party worker of Ajit Pawar group protested Saam Tv
Published On

>> हिरा ढाकणे

NCP Leader jitendra Awhad Comment On Lord Ram :

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यासमोर आंदोलनं करीत आव्हाडांचा निषेध केला. तसेच प्रभू श्री रामाचा फोटो हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जय श्री रामाच्या घोषणा दिल्या.

शरद पवार गटाचा आज शिर्डी येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असताना ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर महाआरती आंदोलन करून निषेध नोंदवला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

jitendra awhad controversial statement about lord ram Party worker of Ajit Pawar group protested
Satara News: साताऱ्याचं ‘स्मार्ट पीएचसी’ पॅटर्न आता राज्यभरात राबवलं जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

यावेळी कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांना ताब्यात घेतले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते आव्हाड?

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ''राम हे शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते. १४ वर्ष वनवासात राहणारे राम शाकाहारी कसे असतील एवढ्या वर्ष जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का? प्रभू राम यांच्याकाळात तांदूळ अस्तित्वात नव्हतं.''  (Latest Marathi News)

jitendra awhad controversial statement about lord ram Party worker of Ajit Pawar group protested
Toyota ची ही SUV महागली, कंपनीने किंमतीत तब्बल इतक्या हजारांची केली वाढ

ते म्हणाले आहेत की, ''मग ते तेव्हा काय खात होते. त्यात राम हे क्षत्रिय होते आणि क्षत्रियांचे जेवण हे मांसाहार असतो. यामुळे माझ्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता नाहीये. जर कोणी माझं विधान वादग्रस्त म्हणत असेल तर कोणी तर मला सांगावे की, राम काय मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी आहेत, ते राम भक्तदेखील आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com