मुंबईत बॉम्ब धमकीचा थरार! JBCN इंटरनॅशनल स्कूलला ई-मेल, पालकांमध्ये घबराट

JBCN International School Dahisar Bomb Threat News: मुंबईतील दहिसर येथील JBNC इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बस्फोटाची ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Police personnel deployed outside JBNC International School in Dahisar after a bomb threat email triggered security concerns.
Police personnel deployed outside JBNC International School in Dahisar after a bomb threat email triggered security concerns.Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: दहिसर येथील JBNC International School ला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शाळेकडे धाव घेत संपूर्ण परिसर सील करून बंदोबस्त वाढवला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तत्काळ सुट्टी जाहीर केली. पालकांना मुलांना सुरक्षितरित्या घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेच्या इमारतीसह आसपासच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळू नये यासाठी दक्षता घेण्यात आली.

Police personnel deployed outside JBNC International School in Dahisar after a bomb threat email triggered security concerns.
Central Railway: बदलापूर,घाटकोपर, दादर; लोकल स्थानकांचा कायापालट; वाचा काय काय झाला बदल?

दरम्यान, मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही व्यापक कट आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

पोलिसांनी नागरिक आणि पालकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. शहरातील शाळांभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com