
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागामध्ये पर्यटकांवर मंगळवारी (२२ एप्रिल) हल्ला झाला. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले यांचा देखील मृत्यू झाला. संजय लेले आणि आम्ही पहिलीपासून दहावीपर्यंत एकाच शाळेत होतो अशी आठवण त्यांची शाळेतील बालमैत्रीण अनघा जोशी यांनी सांगितली आहे. संजय याने काश्मीरला जाण्याआधी आमच्या ग्रुपवर सांगितलं होतं तेव्हा आमचं बोलणंही झालं. आम्ही सगळ्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या मात्र लहानपणीचा मित्र संजय आज आपल्याला अचानक सोडून गेला हे सगळं सहन करण्यापलीकडे आहे, अशा भावना अनघा जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत.
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने पहलगाममध्ये नक्की काय घडलं? याची हादरवणारी कहाणी आता पत्रकार परिषदेत सांगितली आहे. तो म्हणाला की, 'आम्ही तिथे आदल्यादिवशी आलो होतो. तिकडून ज्यावेळी गोळ्या चालल्या, त्यावेळी माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला तेव्हा काहीतरी जाणवलं, मला असं वाटलं की माझ्या हाताला गोळी लागलीय. नंतर मी जेव्हा उठून पाहिलं, तेव्हा मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, ते पूर्ण रक्ताने माखलेलं होतं. मी जेव्हा सर्व बघितलं तेव्हा तिथल्या स्थानिकांनी सांगितलं की, यांना जर मदत पोहोचवायची असेल तर आर्मीवाले येतील. आधी तुम्ही तुमचा जीव वाचवा आणि इथून निघून जा, आणि तो स्पॉट असा होता की, तिथे वर जायला तीन तास लागतात, ते पण घोड्याने.'
'मग तिथे सर्व घोडेवाले आले त्यांनी एकेकाला घोड्यांनी खाली पाठवायला सुरुवात केली, उरलेले बाकी चालत खाली उतरत होते. त्यामुळे आम्हाला खाली उतरायला चार तास लागले. माझ्या आईला पॅरालिसीस आहे, त्यामुळे माझ्या भावाने आणि मी तिला उचलून काहीवेळ चालत खाली आणलं, मग ती स्वत: चालत आली. त्यानंतर जो आमचा घोडा होता, ज्याने आम्हाला वर आणलं, तो नशिबाने तिथे पोहोचला. मग आम्ही आईला घोड्यावर बसवून आईला खाली पाठवलं. मी आणि माझा भाऊ चार तास चालत आलो.' दरम्यान, हल्ल्याचा थरार सांगताना हर्षलला अश्रू अनावर झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.