
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. १६ एप्रिलला त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर विनय पत्नीसोबत काश्मीरला हनीमूनसाठी आले होते आणि त्याच वेळी हा भ्याड हल्ला झाला. लग्नानंतर सहाव्या दिवशीच विनय यांचे सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले. विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
पण आता समोर आलेल्या माहितीनुसार व्हायरल होणारा आणि विनय नरवाल यांचा पत्नीसोबतचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ फेक आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे कपल हे दुसरेच कोणीतरी आहे. या कपलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत व्हायरल होणारा व्हिडीओ विनय यांचा नसून आमचा आहे आणि आम्ही जिवंत आहोत असे सांगितले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कपलला अनेकांचे फोन येऊन गेले. त्यांचे नातेवाईक देखील चिंतेत आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या १९ सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात रोमँटिक गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसून आले. नेटकरी हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की हा लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा हल्ल्यापूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आहे. पण हा व्हिडीओ फेक आहे. हा व्हिडीओ विनय यांचा नसल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कपलनेच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली.
व्हिडिओमध्ये दिसणारे कपल यशिका शर्मा आणि तिचा पती आशिष सेहरावत आहेत. त्यांनी स्वतः समोर येऊन या व्हायरल व्हिडिओचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. या कपलने सांगितले की, 'तुम्ही RIP लिहून एका जिवंत कपलला व्हायरल करत आहात. आम्ही अजूनही जिवंत आहोत. मला माहित नाही की हे कसे आणि कोणी व्हायरल केले. परंतु यामुळे मी आणि माझे कुटुंब खूप अस्वस्थ झाले आहोत. लेफ्टनंट विनय यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण तुम्ही चुकीचा व्हिडीओ शेअर करत जिवंत असलेल्यांना मारले आहे.'
हरियाणातील करनाल येथील रहिवासी विनय नरवाल यांचे १६ एप्रिल रोजी हिमांशीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पहलगामला ते हनिमूनसाठी गेले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये विनय यांची पत्नी हिमांशी त्याच्या मृतदेहाजवळ बसलेली दिसत होती. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लग्नानंतर सहाव्या दिवशीच विनय यांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.