Thane Metro Construction Accident: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी रॉड कारमध्ये घुसला, ड्रायव्हर थोडक्यात बचावला, VIDEO

Metro Construction Accident, Iron Rod On Vehicle : तीन हात नाका परिसरात या कामादरम्यान एका कारवर लोखंडी रॉड पडला.
Thane Accident
Thane AccidentSaam TV
Published On: 

Thane News : मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक विकासकामे सुरु आहे. या विकासाकामांमुळे रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाण्यातील एका घटनेत तर एका कारचालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे.

ठाणे मेट्रोचा पूल उभारणीची काम सुरु आहे. तीन हात नाका परिसरात या कामादरम्यान एका कारवर लोखंडी रॉड पडला. हा रॉड ड्रायव्हरच्या बाजूला वरुन पडला आणि थेड कारमध्ये घुसला आहे. सुदैवाने कार ड्रायव्हरचा जीव थोडक्यात वाचला आहे. (Thane News)

Thane Accident
Solapur News : 'आई तू आणि दीदीला सांभाळ', MBBSच्या विद्यार्थ्यांने हॉटेलमध्ये संपवलं जीवन

नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न

सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळी ही घटना घडली. घटना घडली त्यावेळी गाडीत ड्रायव्हरसह तीन प्रवासी प्रवास करत होते. घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र विकासकामांदरम्यान होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane Accident
Pimpri Chinchwad Name Change: पिंपरी-चिंचवडचे नाव बदलण्याची मागणी, नवीन नावही आलं समोर

मेट्रो अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि कार रस्त्यातून बाजूला घेतली. मेट्रो अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजनांचा पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.