Solapur News : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. आकाश जोगदंड असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे.
आकाश मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. मुळचा बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचा आकाश हा सोलापुरातील डॉ. वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. 2020 पासून सातत्याने त्याला प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यास अपशय येत होते. त्यामुळे नैराश्येतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल आहे.
आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्याने एमबीबीएस परीक्षेत नापास होत असल्याने स्वतःहून जीवन संपवत आहे, कोणालाही जबाबदार ठरवू नये, असं म्हटले आहे. (Latest Marathi News)
तसेच ही गोष्ट अगोदर माझ्या मामांना सांगावी म्हणून त्यांचा मोबाईल क्रमांक आकाशने पत्रात नमूद केला होता.आईला भावनिक आवाहन करताना त्याने 'आई तू आणि दीदीला सांभाळ' असं म्हटलं आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत. (Maharashtra News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.