IPS officer Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरण सीबीआयने केलं बंद

IPS officer Rashmi Shukla: गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरण सीबीआयने केलं बंद
rashmi shukla
rashmi shukla saam tv
Published On: 

सचिन गाड

IPS officer Rashmi Shukla News: विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिसांच्या बदलीमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला होता. या संदर्भातील तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेलं पत्र त्यांनी उघड केलं होतं.

त्या संदर्भातील एक पेन ड्राईव्ह देखील समोर आणला होता. याप्रकरणी तत्कालीन मविआ सरकारने आरोपांचा तपास करण्या ऐवजी गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याचाच गुन्हा दाखल केला होता, हेच प्रकरण आत्ता बंद करण्याचा निर्णय CBI ने घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्याच्या राजकारणात एकावेळी खळबळ उडवून देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यान मधील गोपनीय पत्र लिक प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने बंद केला आहे. कोर्टाने देखील त्याला संमती दिली आत्ता या प्रकरणाचा जणू सोक्ष मोक्षच लागला आहे.

rashmi shukla
Uddhav Thackeray News: 'शिवसेनेत चुकीला माफी आहे; पण पापाला नाही..' उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

नेमकं काय आहे प्रकरण?

मार्च 2021 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला. दलालांमार्फत बदल्या होत असल्याचा

या संदर्भातील तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राचा हवाला फडणवीस यांनी दिला होता. सोबतच कॉल रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव देखील समोर आणला होता. नंतर हा पेन ड्राईव्ह पुढे केंद्रीय गृह विभागाला तपासणीसाठी पाठवण्यात आला.

तत्कालीन महाविकास आघाडीने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमधील गोपनीय पत्र उघड झाल्याचा गुन्हा अनोळखी व्यक्ती विरोधात दाखल केला होता. याप्रकरणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता.

गुन्हा तर नोंदवला गेला, फडणवीसांचा जबाब देखील नोंदवला गेला, मात्र तपास काही पुढे सरकत नव्हता, दरम्यान जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना फुटली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या साथीने शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि काही काळातच इतर अनेक केसेससह या गुन्ह्याचा तपास देखील सीबीआयकडे वर्ग करण्यात आला, ज्याचा तपासच आता सीबीआयने बंद केला आहे.

rashmi shukla
Ajit Pawar News: राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर! जंगी स्वागताची तयारी; नागरी सत्कार होणार

तत्पूर्वी, सीबीआयने तपास बंद केल्यामुळे गोपनीय कागदपत्रे नक्की लीक केली कोणी, कॉल रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह फडणवीसांकडे आला कसा आणि पेन ड्राईव्ह मधील कथित कॉल रेकॉर्डिंग अधिकृत होतं का हे सगळे प्रश्न आता कायमचे अनुत्तरीतच राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com