Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Indian Port Workers Salary News : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ होणार आहे. या पगारवाढीसाठी समझोता करार झाला आहे.
Salary
SalarySaam Tv
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : बंदर आणि गोदी कामगारांचा भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. बंदर आणि गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा पगारवाढीचा वेतन करार संपन्न झाला आहे. इंडियन पोर्ट असोसिएशन आणन सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये समझोता करार झाला आहे. या करारामुळे बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ होणार आहे.

इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये द्विपक्षीय वेतन समीतीच्या बैठकीत समझोता करार झाला आहे. सर्व बंदरांचे चेअरमन आणि सहा फेडरेशनचे कामगार नेत्यांमध्ये करार झाला आहे. द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बंदर आणि गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२६ असा ५ वर्षाचा पगारवाढीचा वेतन करार झाला आहे.

Salary
Chief Justice Salary : सरन्यायाधीशांना किती पगार मिळतो?

बंदर आणि गोदी कामगारांना या करारातून नेमकं काय मिळालं?

वेतन करारानुसार, ३१ डिसेंबर २०२१ च्या मूळ पगारात १ जानेवारी २०२२ चा ३०% महागाई भत्ता विलीन करून त्यावर ८.५० टक्के फिटमेंट दिले जाणार आहे. तसेच कामगारांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. नोकरीत असलेल्या कामगारांना प्रति महिना ५०० रुपये विशेष भत्ता मिळणार आहे. ३ टक्के वार्षिक पगारवाढही मंजूर झाली आहे. १ जानेवारी २०२२ पासून सध्याच्या प्रथेनुसार प्रभावी वेतनश्रेणी तयार केल्या जाणार आहे.

Salary
HCL Tech Company CEO Salary: २ विमानं खरेदी करतील एवढा पगार! ८४ कोटी पगार घेणारे HCL चे विजय कुमार आहेत तरी कोण?

करारानुसार पोर्ट वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना कमीत कमी २ हजार ८३० रूपये आणि जास्तीत जास्त १३ हजार ५९० रूपयांची वाढ होणार आहे. वसाहतीत न राहणाऱ्या कामगारांना किमान ५ हजार ४१० रूपये आणि कमाल २५ हजार ५०० रुपयांची पगारवाढ होणार आहे. निवृत्त झालेल्या कामगारांच्या निवृत्ती वेतनात किमान १ हजार १६५, तर कमाल ६ हजार ५४५ रुपये वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com