एखादी कंपनी चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे सीईओ. कंपनीच्या सीईओचा पगार हा सर्वाधिक असतो. देशात सध्या आयटी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारात प्रचंड वाढ होत आहे. देशातील एचसीएल टेक कंपनीचे सीईओ विजयकुमार हे सर्वाधिक पगार घेत आहे. कर्मचाऱ्यांपेक्षा ७०० पट जास्त पगार त्यांना आहे.
विजय कुमार यांचा वार्षिक पगार ८४.१६ कोटी रुपये आहे. भारतीय आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये सर्वाधिक पगार घेणारे विजय कुमार आहेत. कंपनीने २२ जुलै रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालानुसार, त्यांचा पगार दरवर्षी १९१ टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीच्या अहवालानुसार, सी विजय कुमार यांचे मूळ वेतन १६.३९ कोटी रुपये आहे. त्यांना बोनस म्हणून ९.५३ कोटी रुपये दिले जातात.याचसोबच लाँग टर्म इन्सेन्टिव्ह म्हणून १९.७४ कोटी रुपये दिले जातात.
विजय कुमार यांचा पगार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा ७०७.४६ पट जास्त आहे. त्यांच्या पगारात शेअर्स, भत्ते आणि अनेक इन्सेन्टिव्हचा समावेश आहे. हा सर्व पगार मिळून त्यांना वार्षिक ८४.१६ कोटी रुपये मानधन मिळते. विजय कुमार हे १९९४ पासून एचसीएल कंपनीत काम करत आहेत.
विजय कुमार यांनी सीईओ होण्याआधी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांनी तामिळनाडूच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग केले आहे. विजय कुमार हे सध्या न्यू जर्सीमध्ये राहत आहे.
देशातील मोठ्या कंपनीच्या सीईओंचा पगार
सर्वाधिक पगार घेणाऱ्या आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये इन्फोसिस कंपनीचे सीईओ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इन्फोसिस कंपनीच्या सीईओ सलील पारेख यांना ६६.२५ कोटी रुपये पॅकेज आहे. त्यानंतर विप्रोचे नवीन सीईओ श्रीनी पल्लिया हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी ५० कोटी रुपये वार्षिक पगार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.