जयश्री मोरे
मुंबई - शिवसेनेच्या Shivsena विविध कामगार संघटनांचे कार्यालय म्हणून बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray भवनाचे चेंबूर Chembur येथे हिंद भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश पराडकर Nilesh Paradkar यांनी स्थापन केली आहे.त्याचे उद्घाटन शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत Arvind Sawant, विनायक राऊत Vinyak Raut यांच्या हस्ते पार पडला. चेंबूर येथील सहकार टॉकीज जवळील प्रमोद शिरवळकर चौकानजीक असलेल्या महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ विद्यामंदिर येथे हे भवन तयार करण्यात आले आहे. Inauguration of Balasaheb Thackeray Bhavan at Chembur
हे देखील पहा -
हिंद भारतीय जनरल कामगार सेना, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना, सिने डान्सर असोसिएशन, मुंबई या तिन्ही संघटनाचे कार्य या भवनातून होणार आहे.या भवन च्या उद्घाटन निम्मित मोठ्या प्रमाणत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आठवणींना उजाळा दिला.शिवसेनेला ५५ वर्ष पूर्ण होत असून वर्धापन दिनी या भवनाचे उद्घाटन होत असल्याने कामगार चळवळ बळकट होईल. शिवसेनेला मुंबई महानगर पालिका नवखी नाही आणि मुंबईकरांना ही शिवसेना नवखी नाही आहे. संकट काळात सर्वांनी मदत केली मात्र शिवसेना सारखे सातत्य कोणाला राखता आले नाही.पुन्हा एकदा पालिकेवर दमदार मजबुतीपणे भगवा फडकविणार,आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, मात्र आंगावर आल तर शिंगावर घेऊ, शिवसेनेने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. भाजप बाबत आमच्यात राजकीय मतभेद आहेत परंतू वयक्तीत संबंध चांगले आहेत.अशी प्रतिक्रिया या वेळी अरविंद सावंत यांनी दिली. तर विनायक राऊत यांनी भवनात सुरू होणाऱ्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.