

प्राची कुलकर्णी -
पुणे : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्टीत स्मारकाचे भूमिपूजन व नवीन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते पार पडल्यानंतर त्यांनी गणेश कला क्रिडा केंद्रामध्ये आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता संमेलनामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हे देखील पहा -
यावेळी बोलताना ते म्हणाले 'मी कालपासून बरेच कार्यक्रम केले. मात्र हा कार्यक्रम मला समाधान देणारा आहे. माझ्या घरात कोणी राजकारणी नाही. मी सामान्य कार्यकर्ता होतो मात्र या पक्षाचा आज अध्यक्ष झालो. तसंच 'भाजपमध्ये जो मागतो त्याला काहीच मिळत नाही, आणि जो मागत नाही त्याला न मागता बरंच काही मिळतं., असही ते म्हणाले. भाजपही विश्वातली सर्वात मोठी संघटना आहे. जे लोक भाजपच्या (BJP) दोन खासदारांवरुन भाजपला टोला लगावायचे हम दो हमारे दो असं म्हणायचे मात्र आज ते 44 वर अडकले आणि भाजपा दोनवेळा 300 पार करुन सत्तेवरती आले असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
ते म्हणाले मी पुण्यात आहे. इथे शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) लोकमान्य टिळकांसारखे लोक होते तसंच पुण्यामध्ये भाजपची सत्ता यायला हवी तुमच्या नेतृत्वाने काही चुकीचं काम केलं नाही. तुम्ही अभिमानाने लोकांसमोर जा असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.