मोदी सरकार हे संविधान मजबूत करणार सरकार - रामदास आठवले

या देशातील एनडीएचे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करणारं आणि त्यानुसार चालणारं आहे.
रामदास आठवले
रामदास आठवलेSaamTV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे : या देशातील एनडीएचे (NDA Goverment) सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संविधानाचा आदर करणारं आणि त्यानुसार चालणारं आहे. शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सतत बाबासाहेबांच्या संविधानाची चर्चा करत असतात हे सरकार संविधान बदलणार नाही तर ते मजबूत करणार आहे. असं वक्तव्य केंद्रीय रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं.

हे वक्तव्य त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधीष्टीत स्मारकाचे भूमिपूजन व नवीन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्या दरम्यान भाषणामध्ये केलं.

तसंच दलित बांधवांमध्ये सध्या एक गैरसमज पसरविण्याच काम सुरु आहे. की संविधानामध्ये (Constitution) बदल केला जाणार आहे मात्र या फक्त अफवा असल्याचं आठवलें यांनी सांगितलं. दरम्यान मोदी सरकारने काश्मिरमधून 370 हटवून तेथिल जनतेला आर्थिक सामाजिक न्याय दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आम्ही संपुर्ण देशात नांदावी अशी आमची इच्छा असल्याचं ते म्हणाले.

रामदास आठवले
Amit Shah | छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना - अमित शाह

तसंच साखर कारखाण्यासाठी देखील सहकार मंत्री अमित शाह मदत करणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं मात्र त्यांच्या बाबतच्या अफवा पसविण्याचं काम केलं जात आहे. मात्र सहकार क्षेत्र मजबूत करण्याच अमित शाह करत असही आठवले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com