Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?
महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी गेल्यानंतरही ऊन-पावसाचा लपंडाव कायम आहे
हवामान विभागाने २८ ऑक्टोबरला चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिला आहे
मासेमारी ठप्प झाल्याने माशांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे
महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी गेला असून सद्या ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. अशातच हवामान खात्याने देशात चक्रीवादळाचं भयंकर संकट येणार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय राज्यात पुढील काही दिवस ऊन पावसाचा लपंडाव कायम राहणार आहे. त्यामुळे IMD ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा थेट परिणाम मासेमारीवर होत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या काही दिवसात देशात चक्रीवादळ येणार आहे. २८ ऑक्टोबरला हे तीव्र वादळ आंध्र किनाऱ्यावर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सक्रिय चक्रीवादळाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ११० किमी पर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटले.
या चक्रीवादळाचा थेट परिणाम मासेमारीवर होताना पाहायला मिळतो आहे. गेले आठ दिवसांपासून मच्छीमारीसाठी बोटी न गेल्याने माशांचे दर कडाडले आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी मांसाहारी खवय्यांनी माशांच्या वाढलेल्या दराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मासे नसल्याने माशांचे दर वाढले आहेत.
माशांचे पूर्वीचे आणि सध्याचे दर :
सुरमई यापूर्वी पाचशे रुपये किलो होती आता मात्र ८०० ते १२०० रुपये किलो झाली आहे.
पापलेट यापूर्वी सातशे रुपये किलो होते आता मात्र ९०० ते १५०० रुपये किलो झाले आहेत.
कोळंबी यापूर्वी दोनशे रुपये किलो होती आता मात्र २५० रुपये किलो झाली आहे.
बांगडा यापूर्वी दीडशे रुपये किलो होता आता मात्र २५० ते ३०० रुपये किलो झाला आहे
सतत सुरु असणारा ऊन पावसाचा खेळ, समुद्रात घोंगावणारं चक्रीवादळाचं संकट या सगळ्याचा फटका मासेमारीला बसल्याने माशांच्या भावात कडाडून वाढ झाली आहे. यामुळे खवय्यांच्या तोंडच पाणी पळालं आहे. या चक्रीवादळाचा भारतीय किनाऱ्यावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. तथापि, उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असे आवाहन देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
