

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2023) लढवणार असल्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पीएम मोदींच्या या चर्चेनंतर आता पुण्यातील काँग्रेसच्या आमदाराने लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्षाने जबाबदारी दिली तर मी पुण्याची लोकसभा लढवेल असे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) इच्छुक असल्याचे यावरुन दिसून आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. आतापासून सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागला आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण भाजपने हे वृत्त फेटाळले आहे. पीएम मोदींच्या या चर्चेनंतर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केले. 'पक्षाने मला जबाबदारी दिली तर मी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवेल आणि आमचा विजय होईल.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी अशा बातम्या आल्यानंतर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई झाली आहे. युवकांना रोजगार नाही या सगळ्या गोष्टींवर पीएम मोदी बोलत नाहीत आणि त्यांना जर पुण्यातून निवडणूक लढवायची असेल तर मी सुद्धा निवडणूक लढायला तयार आहे असे मत रविंद्र धंगेकरांनी व्यक्त केले.
पीएम मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे मत भाजपचे नेते संजय काकडे यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर फायदाच होईल, असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. संजय काकडे यांनी नरेंद्र मोदींनी पुण्यातून निवडणूक लढावी म्हणून पत्र देखील लिहिले आहे. नरेंदी मोदी यांनी जर पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यात ४८ पैकी ४८ जागा जिंकू येतील. पुणे शहर आणि राज्याचे भाग्य उजळेल, असंही संजय काकडे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.