नियम आखून बिअर बार उघडता येऊ शकतात तर मंदीरं का नाही? - राम कदमांचा सवाल

''नियम आखून बिअर बार उघडता येऊ शकतात तर मंदिरं का नाही'' असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
नियम आखून बिअर बार उघडता येऊ शकतात तर मंदीरं का नाही? - राम कदमांचा सवाल
नियम आखून बिअर बार उघडता येऊ शकतात तर मंदीरं का नाही? - राम कदमांचा सवालSaam Tv News
Published On

मुंबई : कोरोना महामारीमुळे (corona pandemic) राज्यासह देशात अनेक निर्बंध (restriction) लावले गेले आहे. जवळपास दोन वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वच धार्मिक स्थळांवर (Religious places) बंदी घालण्यात आली आहे. अनेकांकडून धार्मिक स्थळं उघडी करण्याची मागणी होत आहे. यात भाजप मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक आहे. यासाठी भाजपने अनेकदा राज्याव्यापी आंदोलनंही केली आहेत. (If beer bars can be opened with rules, why not temples? - Question of Ram Kadam)

हे देखील पहा -

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे हॉटेल्स, मॉल्स, जीम, उद्याने अशा अनेक गोष्टी कोरोनाचे नियम पाळत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑगस्टपासून अनेक निर्बध शिथील करण्यात आले आहेत. मात्र धार्मिक स्थळं उघडण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. भाजप आमदार राम कदम (ram kadam bjp) यांना ट्विट करत सरकारला मंदिरं न उघडल्यास जबररस्तीने मंदिरात जाऊ असा इशारा दिला होता.

नियम आखून बिअर बार उघडता येऊ शकतात तर मंदीरं का नाही? - राम कदमांचा सवाल
पुणे तिथं काय उणे! चक्क पंतप्रधान मोदींचे उभारले मंदिर

राम कदम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ''आज मंगळवार आम्ही सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नियमांचे पालन करत जाणार. प्रथम सकाळी 10:45 वाजता दादर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात नारळ,फुल,हार,नैवेद्य,दुर्वा घेऊन नियमांचे पालन करीत जाणार. बियर बार जर नियम आखून उघडता येऊ शकतात मग मंदिरे का नाहीत? याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे. त्यांनी जरूर नियम करावेत आम्ही पालन करू. मात्र टोकाचा तीव्र हिन्दू विरोध आम्ही सहन करणार नाही.'' राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे उघडली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com