पुणे तिथं काय उणे! चक्क पंतप्रधान मोदींचे उभारले मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा करिश्मा काही और च आहे! मोदींचे भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही
पुणे तिथं काय उणे! चक्क पंतप्रधान मोदींचे उभारले मंदिर
पुणे तिथं काय उणे! चक्क पंतप्रधान मोदींचे उभारले मंदिरअश्विनी जाधव केदारी
Published On

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा करिश्मा काही और च आहे! मोदींचे भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही ,  पुण्यातील अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क मोदींचे मंदिर उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे, पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे, पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे.   पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे.

हे देखील पहा-

याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला आहे, १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे.

पुणे तिथं काय उणे! चक्क पंतप्रधान मोदींचे उभारले मंदिर
Prime Minister Modi's temple in Pune | पुण्यात पंतप्रधान मोदींचं मंदिर, नक्की पाहा ही बातमी

या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी यावेळी सांगितले आहे. आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी त्याच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  खरंतर मोदींना उपमा देण्यासाठी भक्तांची दररोज नवनवी कसरत चालू असते.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदीस्तुती करणारे एक ट्विट केले होते.  ट्विटमध्ये तयांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे. या विषयावर ही टीका टिप्पणी केली गेली, त्यांनतर आता तर थेट मोदींचे मंदिर उभारले गेले आहे त्यामुळे आता चर्चा तर होणारच...

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com